शनिवार, २५ मे, २०२४

सांस्कृतिक गुलामगिरीच्या विळख्यात

 





सांस्कृतिक गुलामगिरीच्या विळख्यात 



मराठी बोलताना मध्ये मध्ये इंग्रजी वर्डस यूज करण्याची जी हॅबीट आहे...विशेषतः न्यू जनरेशन मध्ये ती फारच डिटेस्टेबल आहे !! आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मस्ट बी ऑप्शनल.


स्वभाषा जागरण समितीच्या अध्यक्षाने आपल्या भाषणाची सुरुवात इंगाजीतून केली. तब्बल पंधरा मिनिटे अस्खलित बोलून झाल्यावर त्यांनी खुलासा केला की मातृभाषेचा अभिमान हा इंग्रजीच्या अज्ञानातून आलेलं नाहीये, हे सिद्ध करण्यासाठी मी असे केले. त्यानंतर त्यांनी अस्खलित मराठीतून पुढील भाषण केलं. अजूनही नवीन संभाषणाची सुरुवात अनेकांना इंग्रजीतून करण्याचा मोह आवारात नाही. इंग्रजी येत ही दोघांचीही खात्री पटली कि ते मराठीवर उतरायला मोकळे होतात...हे खरं कि खोटं? ही या वाघिणीच्या दुधाची दहशत आहे.




इंग्रजीने दिलाय बुजरेपणा


 एकेकाळी अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची ही भाषा म्हणून एक आदरयुक्त धाक आजही मनामध्ये आहे.. ही आंतरराष्ट्रीय भाषा अंडी केवळ शिक्षित लोक बोलू शकतील म्हणूण प्रतिष्ठेची य्यार्थी तरुणाई इंग्रजी आत्मसात करण्याची महत्वाकांक्षा ठेवतात. पूर्वी कायदा, मेडिकल, अभियांत्रिकी यात इंगाजीचाच बोलबाला असल्याने या माध्यमातून शिक्षणाचा प्रारंभ केला तर आपण प्रगत गणले गाऊ असा आजही अनेक पालकांचा दृढ समाज आहे. पर्यायाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा तुलनेने अधिक standard वाटू लागतात. येथे प्रतिष्ठा चीक्त्ल्याने ते स्टेटस सिम्बॉल होतात. परिणामी काय वाट्टेल ते करून त्या शाळे पाल्याला घातले तर पितर स्वर्गात गेले ही धन्यता मानतात. स्वत्वाचा अभिमान आपण सोडतोय ही कापणा मनाला शिवत नसेल काय? हे लोक ज्या इंग्रजांना ललामभूत मानतात खुद्द ते इंग्रज स्वभाषेची पायमल्ली कधीच करत नसतात. इंग्रजांच्या या बहुमोल गुणाचे अनुकरण आम्ही कधी करणार?

बस्तुतः इतर अनेक भाषांप्रमाणेच इंग्रजी निव्वळ एक भाषा ही ओळख मागे पडून जर ती एक प्रतिष्ठेची खूण म्हणून स्वनामधन्य गुलाम राष्ट्रे मिरवू पाहत असतील तर ते अज्ञांमुलक नव्हे काय? अनेकदा महत्वाच्या ठिकाणी बोलणी करताना एखादा वासरात लंगडी गाय नक्की नेण्यात येतो. तेथे तो पुरेपूर भाव खून जातो. इंग्रजी थोडेफार येत असले तरी तो सभोवताल आदरणीय होऊन त्याला एक प्रभावळ प्राप्त होते.


भाषेला संस्कृती चिकटून असते म्हणतात. पण शेवटी घरोघरी मातीच्या चुली. माणूस इथून तिथून सारखाच. पण अजूनही अनेक लोक मद्यधुंद अवस्थेत इंग्रजी बोलू लागतात. ते व्याकरणाच्या नियामाशी फटकून असो अथवा  काळ क्रियापदाचा ताळमेळ नसो...उर्मी ही विलक्षण चीज असते.  चिडले कि हमखास इंग्राजीची कास धरणारे अवतीभवती आपण नेहमीच बघतो  याचा अर्थ अंतर्मनात कुठेतरी आपण इंग्रजी बोलू शकलो पाहिजे ही सुप्त इच्छा कायम घर करून असते. भावनेच्या भरात ती बाहेर पडते.

आधी भाषा तयार होते आणि नंतर व्याकरणाचे नियम घालून दिले जातात. इंग्रजी शिकू इच्छिनाणारे नेमकी उलट क्रिया करत असतात. ते व्याकरणामार्फत इंगाजीच्या कच्छपी लागतात. परिणामी ते इंग्रजी वाचू शकतात. प्रयत्नांती लिहू शकतात पण काही केल्या बोलू शकत नाहीत. हे शाश्वत सत्य आहे. याउलट फक्त इंग्लंडमध्ये काही वर्षे वास्तव्य केले तरी सहज इंग्रजी फारसा सराव न करता बोलता येऊ लागते ही वस्तुस्थिती आहे.


इंग्रजी बोलून छाप पाडण्याची उर्मी भल्याभल्यांना आवरत नाही. किंबहुना तोंडावर इंग्रजी फेकले रे फेकले की  लगेच  समोरचा गर्भगळीत होत्साता निमुटपणे वागणार याची खात्री असते. परिणामी इंग्रजीचा ते हत्याराप्रामाने वोर करताना आढळतात. कार्यालयीन कामकाज करताना आपली बोलीभाषा गुंडाळून ठेवून जेव्हा आपण उगाच इंग्रजीतून काम करू लागतो तेव्हा ही इंग्रजी आपण अवजाराप्रमाणे कामासाठी वापरून घेतोय असं अनेकदा मनात येत.

इंग्रजीचा दुश्मन अजिबात नाही इंगाजीचे अनेक चांगले गुण आहेत. केवळ सव्वीस मुलाक्ष्राम्ध्ये ही भाषा सामावलेली असून टी हात न उचलता साफ्फीने घसाटीत लिहिता येते. अनेकदा अक्षले उच्चाराशी फारकत घेऊन असल्याने स्पेलीन्ग जाणीवपूर्वक पाठ करून ठेवावे लागते. त्यातही इंगाजांचे बोबडे उचार अनेकदा मूळ शब्दांशी मेळ खात नसल्याने इंग्रजी निव्वळ ऐकून पचनी पडणे कठीण जाते. पण हे थेट मान्य न करता, त्या बोलीचे कौतुक मनात साठवून आपण त्याच लकबीने बोलण्यात जर धन्यता मनात असू तर आता हसावे कि रडावे?


इंग्रजीच्या प्रभुत्वाचा आपण मापदंड कोणता वापरणार? इंग्रजीचे पण अवतार आहेत, ब्रिटनचं इंग्रजी प्रमाण मानायचं कि अमेरिकेचं कि ऑस्ट्रेलियाचं? त्यात स्पेलीन्ग आणि उच्चाराचेही भेद आहेतच. वरून क्षेत्रानुरूप अहमन्यतेचा अंतर्विरोध आहेच. जुनं शेक्सपिअरच्या काळचं इंग्रजी आणि नवे इंग्रजी भिन्न.  घरगुती इंग्रजी कार्यालयीन इंग्रजी, कायद्याचं इंग्रजी साहित्यिक इंग्रजी भिन्न. अबब...म्हणून मी  म्हणतो बिनधास्त चुकीचं  इंग्रजी बोला....आत्मविश्वासाची उभारी ताठ ठेवून सतत बोलत रहा...म्हणजे काय होईल? सहा महिन्यांत तुम्ही बऱ्यापैकी इंग्रजी बोलू लागाल तेही कुठलाही कोचिंग न लावता ..आता बोला !

म्हणून वेतन कमी असले तरी कार्यालयात काम करावे किमान इंग्रजी पत्रव्यवहाराची ओळख होईल. धास्ती मुले इंग्रजी आवाक्याबाहेर वाटते. वरून हा प्रतिष्ठेचा विषय असल्याने सामन्या विद्यार्थी न्युन्गान्दाने पछाडला जातो. आणि बुजरेपणाचा शिकार होतो. मुलाखतीच्या वेळी केवळ इंग्रजीशी नाळ जुळली नसल्याने यामुळे अनेक हुशार लोकांना शर्यतीत माघार घ्यावी लागते ही खरेच शोचनीय बाब होय.


विशीच्या तारुण्यात अशी काही संप्रेरके जोर करतात कि माणसाचे अनेक सुप्त गुण फुलारून वर येत्तात. मी  कार्यालयीन कामात लागलो. correspondance करताना drafting practice झाली. confidence जोमात आला. अस्खलित इंग्रजी जमू लागले. आता लोक वचकून राहतात असा अनुभव पण याच काळात आला. त्यामुळे वेळी अवेळी नको तेथे इंग्रजी मारून  आपली वाट निष्कंटक करण्याची सवय लागली. पण एकदा त्यामुळे एका घरमालकाने  माझे काम केले नाही. तुम्ही काय बोलाल ते आम्हाला समजत नाही अशी सबब पुढे करून घर देण्याचे साफ नाकारले हा एक अपवाद आणि बाका प्रसंग वगळता बहुतांश ठिकाणी इंग्रजी आपला अंमल गाजवते असाच अनुभव जमेस आहे.

वाढत्या वयोमानाने इंग्रजीची नव्हाळी संपुष्टात येते. पूर्वग्रह सपाट झालेले असतात. जेथे जरुरी तेथेच इंग्रजीचा प्रसंगी वापर करण्यात शहाण्पांना असतो हे सत्य समजू लागते. इतकी की सदर व्यक्ती उत्तम इंग्रजी बोलत असे हा इतिहास होऊन जातो. जाणीवपूर्वक लादलेल्या कला दगा देऊ लागतात.आपले निकटवर्ती, घरचे आप्त आणि आजवर ज्यांचेशी कधी इंग्रजी बोलण्याचा प्रसंग आल अनाही अशांशी त्वरित इंग्रजी बोलणे अवघड जाते. शेवटी माणूस निसर्गावास्था या मुल्तात्वाकडे जाण्याचा एक टप्पा असतो.


इंग्रजी अभावी मुलाखतीत आत्मविश्वास गमावणाऱ्या युवकांची संख्या फ्फार मोठी आहे.

पारिभाषिक शब्दांची वानवा 


पर्यायी पारिभाषिक शब्द असे काही जगड्व्याळ तयार करतात की त्यामाने इंग्रजी सुलभ असा कुणाचाही समाज व्हावा. हे परिभाषा निर्मितीचे विरोधक असावेत काय? प्रत्यक शब्दाचा शब्दशः भाषांतराचा आग्रह धरला तर अशी निर्मिती होणारच. अनेकदा  केवळ निर्रथक पण छोटी सुटसुटीत शब्दयोजना करून पारिभाषिक शब्दकोश सजवावा लागतो. 

शिशूला हवी मातृभाषेची गुटी 


त्या दिवशी आमचे स्नेही श्री मधुकरराव कुलकर्णी आपला चार वर्षाचा गोड नातू चि. प्रयांशला घेऊन आले होते. मुलगा सून दोघेही न्यूयॉर्कला असतात. मी नातवांच गालगुच्चा घेत नाव विचारलं...पण तो आजोबांकडे बघत राहिला. धड इंग्रजी नाही...धड मराठी नाही अशी त्याची अवस्था बघून मि विचारलं. "अरे... हा कोणत्या भाषेत बोलतो?"

"सगळं मिक्स आहे !" आजोबा कौतुकमिश्रित नजरेने म्हणाले.


"असं म्हणून कसं चालायचं रे बाबा....जन्मानंतर कानावर पडणारी भाषा आणि अनुवांशिक तत्वाने येणारी भाषा यात अंतर आहे. भाव-भावना, उच्चार -विचारांना आकार वळण मिळते ते मातृभाषेतूनच. pre-school and preliminary education children must learn in mother-tongue then in middle school he may choose second language...third language. Also he may become multi-lingual. मुद्दाम इंग्रजी विचारांचा दाखला देतोय. त्यानंतर मातृभाषेतून बालकाच्या संवादाचा श्रीगणेशा होण्याबाबत जी साधक-बाधक चर्चा झाली त्याच इतिवृत्तांत सदर करत आहे.

नवजात शिशुसाठी लसीकरण मोहिमे अंतर्गत डॉ एक चार्ट देतात. त्यात एक एडिशन ...सुरुवातीपासूनच मातृभाषेचा गुटी देण्याबाबत उल्लेख असावा असं वाटतं. जगातील विविध भाषांबाबत बाळ अनभिज्ञ असतो. पण जेनेटिकली बीजस्वरुपात  अनेक गुण सोबत घेऊन  आलेलं  असते. याअर्थी मातृभाषेशी त्याची ओळख असते. त्यातूनच संभाषणाला प्रारंभ झाला तर ती ओळख दृढ होऊन बालक आत्मविश्वासाने शब्दवैभव आणि वाक्यरचना करू लागतो. ही नैसर्गिक क्रिया असून यासाठी विशेष काहीच प्रयत्न करण्याची गरज नसतेच मुळी !


पण बालकाच्या पालकांना बाल नव्या जमान्यात रुळून सक्षम व्हावे याची ओढ आणि घाई झालेली असते. इंग्रजी भाषा शिकल्याने पुढे जगात वावरणे सुलभ होईल या  अज्ञानमूलक जाणीवेने ते प्रयत्नपूर्वक इंग्रजी शिकण्यावर भर देतात. पण येथेच त्याच्याजवळील बीजभाषेशी त्याचे शब्द जुळत नाही. एकाच अर्थाचे विविध भाषेतील शब्द लादण्याच्या प्रयत्नात बालक गोंधळात पडतो. सर्वात भयंकर म्हणजे हे तो बोलून स्पष्ट  करू शकत नाही. परिणामी धड इंग्रजी येत नाही आणि धड मातृभाषा तो बोलू शकत नाही. सुजन पालक यावर डोळसपणे विचार करतील ?


मातृभाषेतच विचार, भावना, संवेदना आणि अभिव्यक्ती यांचं विकास समृद्ध आणि वेगाने होतो. हे सत्य नाकारण्यात काही  अर्थ नाही. जगात विविध भाषा अस्तित्वात आहेत. त्यातील अमुक भाषा शिकायच्या असतात. त्यांची ही नावे आहेत. या पद्धतीने दोन भाषेतील फरक आणि महत्व तो ओळखू लागतो तेव्हाच तो नवी दुसरी भाषा शिकायला सज्ज होतो. तोवर एक अर्थाचा डबल तीबल शब्दकोश त्याच्यात कोंबण्याचा अट्टाहास कशाला ? हा जांच नव्हे काय  ?


वय वर्षे पाच पर्यंत बाळाची शारीरिक मानसिक बौद्धिक वाढ ही अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत स्वरूपाची असते. मेडिकल सायन्स नुसार वय वर्षे सहा असताना बोटांनी लेखणी घट्ट करू शकतो. म्हणून पूर्वसुरींनी शाळेत घालण्याचे वय सहा वर्षे ठरवले होते पण आता प्री - नर्सरी, नर्सरी, केजी वन, केजी टू ही मालिका पालकांच्या सोयीने अस्तित्वात आली हे सहजच ध्यानात येईल.



बाल मानसशास्त्र अनुसार बालकाला सवंगडी वय वर्ष सहा नंतरच गरजेचे असतात. तोवर तो एकटा चांगला खेळतो स्वतः तच रममाण होतो. आत्मसंवाद साधतो तो त्याच्यातील स्व चा एक शोध असतो. तात्पर्य जन्मानंतर कानावर पडणारी भाषा हे अनुवंशिक तत्त्वाने येणारी असल्याने विशेष वेगवान ठरते इथेच भावना आणि विचारांना आकार आणि वळण मिळतं


बुद्धी म्हणजे काय? निश्चित दिशेने मानसिक वृत्ती धारण करण्याची शक्ती आणि लक्ष्य प्राप्त करण्यासाठी समायोजन करण्याची आणिआत्मटीकेची शक्ती होय. असं बीने  नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो. दोन प्रमेयांमधील संबंध शोधून काढून त्या संबंधांच्या आधारे सहसंबंध शोधण्याच्या क्षमतेला बुद्धी म्हणतात असे स्फीयरमनचं मत आहे. तर उपयोगात आणलेली क्षमता म्हणजे बुद्धी असं वूडवर्थ म्हणतो. यात मतभेत तूर्त बाजूला ठेवले तरी बुद्धीचा विकास हा प्रमुख आहे. "बुद्धीने सर्वही होते बुद्धिदाता नारायणु" - असं वचन आहे. बुद्धी ही भाषेतून व्यक्त होते. बुद्धीचा उपसर्ग स्वभाषेतून कुठल्याही अडथळ्याविना होणे ही प्रमुख गरज आहे


प्रत्यक्षाकरणाची प्रतिक्रिया जन्मानंतर लवकरच सुरू होते. स्तनपानाचे ज्ञान तर मुलाला फार लवकर येते दुसऱ्या आठवड्यात उष्ण-शीत तर तिसऱ्यात आंबट गोड पदार्थ हा भेद तो करू शकतो.  तीन महिन्याच्या वयात रंगांना प्रतिक्रिया केली जाते एका वर्षात लाल हिरवा निळा पिवळा या रंगात तो भेद करू शकतो. 


संबोधन विकास यात वस्तूचा संबोध आणि वस्तूच्या गुणांचा संबोध असे दोन प्रकार आहेत उदाहरणार्थ मांजर खुर्ची टेबल हे वस्तू संबोध आणि झाडांचा हिरवेपणा मांजराचा आवाज वगैरे वस्तूगुण संबोध.  प्रथम वस्तू संबोध होतो मग गुण संबोध होतो दोन वर्षे वयाचा मुलगा सजीव आणि निर्जीव यात भेद करू शकत नाही.आकृतीचे आकलन साधारणतः तीन वर्षाच्या आत पूर्ण विकसित होते. यातही मतभेद आहेतच…. गिबसनच्या मते आकाराचा संबोध 18 महिन्याच्या मुलातही विकसित झालेला नसतो. वगैरे असो.



जन्माच्या वेळी व तद्नंतर लगेच असंघटित व निरर्थक असणाऱ्या स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे कारक विकास ! अशा विकासाच्या प्रक्रियेतून बालक जाताना  भाषा हे एक प्रमुख माध्यम असते आणि मातृभाषा तिथे नैसर्गिकपणे आणि सहज काम करून जाते. उदाहरणार्थ देवनागरी लिपीतील परभाषीय वाचन आपण करू शकतो पण स्वभाषेइतके प्रभावी होऊ शकत नाही. यात दुमत असण्याचे कारण नाही. वाचन हे एक शांत संभाषण असतं पुस्तकातील पात्र आणि स्वतःशी..... जे  मेंदूत सेव्ह होत असते.



प्रगतीचा हा आकृतिबंध ठराविक नैसर्गिक साच्यातून जातो. भाषा ही ही वाहिनी आहे अलग अलग भाषा शिकणे हे मानवीय आहे.... नैसर्गिक नाही. बाळ बीज स्वरूपात अनेक गुण सोबत घेऊन आलेला असतो असं मानववंशशास्त्र चे अभ्यासक म्हणतात. भाषा ही त्यातच समाविष्ट असते. जी भाषा बाळाची आई, आजी ,पणजी, खापर पणजी बोलत होती तीच भाषा सहज-सुलभ असते अन्यथा "भाषिक कोंडी" या भयंकर प्रकाराला सामोरे जावे लागेल.


परभाषा शिकणे किंवा बहुभाषिक होणे यात गैर काही नाही अवांतर अतिरिक्त भाषा म्हणून शिकणे ही गरजेचे आहे अन्यथा दुभाषी कसे तयार होणार देशोदेशी मध्ये संवाद कसा होणार यासाठी प्रसंगी हौस म्हणून परदेशात जाऊन पर भाषेचे शिक्षण घेण्याची सर्वांना मुभा आहेच ! पण ही प्रक्रिया नंतरच्या काळात असावी शिक्षणाचा श्रीगणेशा होताना असू नये हा कळीचा मुद्दा !

 

इंग्रजीला एवढेच कवटाळून बसायचे होते तर त्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याला काय अर्थ उरतो? चीन आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये स्व भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देण्यात येते जपानमध्ये बालकांना परभाषेतून शिक्षण म्हणजे देशाचा झेंडा खाली उतरवणे असे मानले जाते प्रतिष्ठेपायी आपण स्वभाषेतून संभाषण करणे कमीपणाचे समजत असू तर स्वतःला पुरोगामी कसे म्हणावे? अशाने आपली जागतिक ओळख कशी होणार? स्वत्व कशात आहे ? याचा विचार कधीतरी करायला हवा



आपल्या संविधानात अस्मितादर्श प्रतीक म्हणजे झेंडा चलन आणि भाषा. चलना बद्दल जशी कठोरता आहे तशीच भाषेबद्दल हवी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही ही अजून इंग्रजीच्या कुबड्या आपण सोडत नसू तर ते परावलंबी पराभूत मानसिकतेचे प्रवाह पतित लक्षण आहे. टप्प्याटप्प्याने का होईना विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय स्थापत्य, सनदी लेखापाल इत्यादी शिक्षण मातृभाषेतून होईल तेव्हाच भारत परीपूर्ण विश्वगुरू होऊ शकेल.


शिक्षणासाठी मूल पहिले पाऊल टाकते तेव्हा समाजाशी त्या विणीचा टाका मातृभाषा घालत असते. ज्या भाषेतून मला रोजचे आयुष्य सहजपणे जगता येते तसेच व्यवहार सुलभ होऊ शकतात ती मातृभाषा असते. भारताप्रमाणे चीनमध्ये ही प्राचीन संस्कृती आहे म्हणून तुलनेसाठी या देशाचा विचार करता येईल चीन मध्ये अनेक प्रादेशिक भाषा आहेत पण तिचे एक राजभाषा प्रमुख आहे आपली हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तात्पर्य स्वभाषा ही मानवाची जीवनाधार असते

आपण सहज म्हणतो तरुण पिढी बिघडली म्हणजे काय झालं ? आपण मुलांची संपत्ती शैक्षणिक शारीरिक गरज भागवली पण सांस्कृतिक आणि संस्काराची गरज न भागवल्याने ही पिढी भोगवादी आणि चंगळवादी झाली या दोष कुणाचा म्हणून मातृभाषेची गुटी मिळाली तर बाळ बघ सर्वांगाने आणि सर्वार्थाने गुटगुटीत होणार हे सत्य दृष्टिआड करून चालणार नाही

 

महात्मा गांधी यांचं आजवर वाचलेल्या वचनांपैकी माझं सर्वात आवडतं कोटेशन सांगू?
“दुनियासे कहा दो....गांधी अंग्रेजी नाही जानता ...”


पाश्चिमात्य दिनचर्या आणि जीवनशैलीचा अंगीकार 


संस्कृती हा खूपच मोठा व्यापक शब्द आहे 



आम्ही संस्कारांवर पाणी का फेरतोय ?


गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

दशतत्वांचे प्रदूषण का ?

 


नाद-ब्रम्हाचे प्रदूषण 

लग्नाची वरात, मिरवणूक, शोभायात्रा असो वा गणपती, दुर्गा, शारदा स्थापना किंवा विसर्जन ! हल्ली डीजे नामक कर्कश वाजंत्रीने एकीकडे तरुणाईला वेड लावलंय आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची झोप उडवलीय ! तिसरीकडे प्रदुषणाने पर्यावरणवादींच्या चिंतेत भर घातलीय.  डीजेच्या या भीषण गदारोळात  अभिजात भारतीय संगीत, सदाबहार उपशास्त्रीय संगीत, सनईचे मंजुळ मंगल स्वर कुठेतरी हरवल्यागत झालेयत ! त्यातही संगीतात रिमिक्स, फ्युजन इत्यादी नवनवीन प्रकार बोकाळलेत...अशाने नव्या पिढीला दर्जेदार नाद-माधुर्याची ओळख  ?कशी होणार ? एक जाणकार वर्ग याची   दखल घेत पुढे सरसावेल  काय?


दर्जाहीन सिनेगीतांचे सामाजिक दुष्परिणाम 

तरुणाईच्या तोंडी कोणती गाणी आहेत यावरून देशाच्या नैतिकतेचं मोजमाप करता येतं. १९६० --७० च्या दशकातील सिनेगीतांचा तो इतिहासजमा काळ आठवा ...ती जुनी गाणी सदाबहार या श्रेणीत का मोडतात? मराठी  नाटकांचा सुवर्णकाळ होता ती गाणी रसिक अजूनही तल्लीन होऊन का ऐकतात?   याउलट  हल्ली गाणी कधी येतात आणि विस्मृतीत गडप होतात कळत देखील नाही. असं का ?चोळी के पीछे क्या है ...मुन्नी काय... जलेबीबाई  काय...शीला की जवानी काय...सरकालो खटोली...मी तो तंदुरी मुर्गी...गटकाले  सैया अल्कोहोलसे ...आम्ही कुठे जातोय ? याचा कुठेतरी विचार व्हायला हवा.

पूर्वी ही शब्द-शुचिता कटाक्षाने पाळली जात असे. व्ही.शांताराम यांच्या पिंजरा या गाजलेल्या चित्रपटात जगदीश खेबुडकर यांचे एक गीत आहे...डे रे कान्हा चोळी अन लुगडी...या मूळ गीतात  देहाहूनही नग्न भावना आसे शब्द होते..पण गायिका लताजीनी यावर आक्षेप घेतला...तेव्हा देहाहूनही मुक्त भावना असा बदल करण्यात आला. शब्द शुचितेचे असे भान राखले तर समाजात अनैतिकता पसरणार नाही 

तुरळक सन्मान्य अपवाद वगळता, गाणी एकसुरी तयार होत आहेत. एकाच श्वासात भरभर म्हंटलेले गाणे म्हणून भलावण होते पण त्यात एक  गाणं म्हणून गुणवत्ता किती?   त्याचे संगीत कर्कश तर होत नाही? याचा विचार नवी पिढी करताना दिसत नाही.उलट  नवी पिढी त्यालाच नाविन्याचे प्रतिक मानते...याचा फायदा चालते-पुर्जे व्यावसायिक घेतात आणि  संगीत विटंबन प्रयोग बघावा लागतो किमान ,गाण्याच्य बाबतीत मागची पिढी नक्कीच सुदैवी..  हे खरे की खोटे? 

नुकताच चंद्रपुरातील दुर्गा विसर्जनाच्या दिवशी गाफिलपणे मी  मुख्य मार्गावरून जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला आणि  एक विलक्षण थरार अनुभवला …. दुतर्फा चिंचोळ्या, खडकाळ गल्ल्यामधून क्रमाने दुर्गामुर्ती डी. जे. समवेत येउन मुख्य प्रवाहात सामील होत होत्या। माझ्यासारखे अडकलेले अनेक लोक  विषण्ण  होत्साते  हताशपणे कसाबसा मार्ग काढीत होते. गांधी चौक ते जटपुरा  पूर्ण रस्ता शेकडो डी ज़े. ने व्यापला होता …त्या अनुभवातून हा एक प्रातिनिधिक लेखनप्रपंच !  मनात साहजिकच अनेक प्रश्न निर्माण झाले …!!

शांतीच्या शोधात.....

 कर्कश, कर्णकटू, बिबत्स , गलिच्छ  डी .जे.(Disco Jocky) च्या ध्वनी प्रदूषणाचा धार्मिक भावनेशी दुरान्वयाने  तरी संबंध आहे काय ? धार्मिक भावना सोडा ,,निव्वळ आनंदासाठी असले हिडीस, विकृत, असुरी कृत्य  केले जावू  शकते काय ? रस्त्यावरून वाट काढणाऱ्या निष्पाप नागरिकांचा त्रागा अजिबात ओळखू न शकणारी ही तरुणाई  स्वतःची काय प्रतिमा निर्माण करीत आहे ?

 डी ज़े. च्या घाणेरड्या आवाजावर केवळ आसुरी उन्माद असणाऱ्याना... तेही दारू पिऊनच नाचणे  शक्य आहे . हे वास्तव असताना महिलांचा सहभाग असलेल्या देवीच्या उत्सवात  हे सारे कसे   काय चालते ? मां आ  रही है हर गलीसे ...डीजे के सामने  नाचोंकी फौज लेके ...ये  कैसी विटंबना !!

इथे एकमत कसे ?

खड्डे , अरुंद जागा त्यातून उत्सवाच्या नावे उसळलेला हा उन्माद , अतोनात परिश्रम , वारेमाप पैसा उधळून हा जल्लोष  अखेर काय मिळवून देतो ? याऐवजी काही वेगळे लोकोपयोगी करण्याचे कधीच कुणाच्या मनात का येत नाही, मोठा आवाज निर्माण करण्यात सर्वांचे नेहमी कसे एकमत होते ? कर्कश आवाज निर्मिती  कोणत्या आनंदाचा लाभ करून देते …हे बराच विचार करूनही आकलन झाले नाही !

हा तो नटराजाचा अपमान 

या निमित्ताने लक्षात आले …अरेच्चा इतक्या लोकांना हात वर करून कंबर हलवायची आवड होती तर !! ( होय… याला नाच कसे म्हणावे …तो नृत्य कलेचा अपमान होईल ) या शारीरिक कृतीतून ते काय व्यक्त करू इच्छितात ? या हीन अभिरुचीच्या प्रदर्शनाने कोणत्या ताणाचा निचरा होणार ?
हे पराभूत मानसिकतेचे लक्षण नाही काय? दर्जेदार भारतीय संगीताच्या देशात हि हीन अभिरुचीची राक्षसी महत्वाकांक्षा कोठून आली ?

मंडळात  एकी नाही …।  अन्यथा समोरासमोर मूर्ती बसवल्या नसत्या …तसेच एखाद्या  लोकोपयोगी कार्यासाठी हे सर्व जण   मिळून काही करताना कधी का दिसत नाही ?

यावर चर्चा केली असता जाणकार म्हातारबुवा एकाच उपाय सांगत होते  …या  दिवशी  चुकूनही या मार्गावर सुजाण माणसाने येऊ नये…परंतु हा उपाय नसून एक नकारात्मक दहशत आहे हे ध्यानात कसे येत नाही ?या सामाजिक  समस्येवर सकारात्मक क्रांतिकारक बदल घडवून आणणारा कुणी माई का लाल कधीच पैदा होणार नाही का ?प्रश्न …प्रश्न …आणि प्रश्न  !!!
 
डिजे एक भीषण मानवनिर्मित  अमानवीय संकट

विज्ञानाने माईक आणि आवाज कमीजास्त करण्याची सुविधा दिली आणि धूर्त मानवाला गैरवापर करण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी ग्रामीण भागात भाषण करीत.तेथे माईक नसत...तेव्हा गांधीजी मध्ये उभे राहत भोवताली चारही बाजूनी श्रोते.... असे ते दृश्य असे.

जागोजाग गणपती, देवी, शारदा ...अचानक एवढी धार्मिकता कशी वाढली? विसर्जनाच्या दिवशी मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तरुणांच्या गणेश मंडळाची बात सोडा.. अगदी गल्लीतल्या  महिला मंडळाच्या देवीला आगमन आणि गमानाला संदल बोलावला होता. संदल पथकाजवळ नवेकोरे संदल दिसले. जागोजाग मागणी वाढली असावी...मागणी तसा पुरवठा हा तर अर्थशास्त्राचा सिद्धांतच आहे.पूर्वी केवळ मोठे आयोजकच हे सारे करू शकत असत...त्याआधी संदल हे मोहर्रमच्या उरूसलाच दिसायचे.पण आता हम किसीसे कम नही हा नारा जिंदाबाद  आहे. 

गणपती नंतर महिनाभराने देवी येतात...देवी या गणपतीच्या तुलनेत दुप्पट असतात. याचे कारण बहुदा गणपतीत पुरुष आणि युवावर्गाचा भरणा असतो पण देवी उत्सवात मात्र उर्वरित ५० टक्के महिला  सामील होतात. परिणामी गणपतीच्या तुलनेने दुर्गा अधिक दिसणे क्रमप्राप्तच ! या धार्मिक निमित्ताने नाद्ब्राम्हाची ऐशी-तैशी का? हा विषय चर्चेचा नाही का? डीजे चे एकावर एक व्हुपर ठेवून ते वाजत असताना त्याला टेकून एखादा पोऱ्या आरामात कसा बसू शकतो? मन-मस्तिष्क वर इतक्या आवाजाला कसे सहन केले जावू शकते? रस्त्यात कुणाचं चुकून धक्का लागला तर्लागेच गाली-गलौच आणि व्यक्ती-स्वातंत्र्यावर आक्रमण होते...मग हे सारे दुष्परिणामा कडे डोळेझाक का?

त्रासले बाप्पा डीजे पायी 

सार्वजनिक गणपतीच्या उत्सवाचा मूळ उद्देश जर संपला असेल आणि त्यात हे हिडीस प्रकार खुद्द बाप्पाही हे सर्व बघून त्रासले आहेत अशी व्यंगचित्रे आपण या दिवसात बघायला मिळतात.

अहाहा काय पण उत्तेजक दृश्य....डिस्को जॉकीच्या तालावर सॉरी ठेक्यावर  संदल बडवत होते. पोरं पोरी इतकाच काय साड्या नेसलेल्या वयस्कर महिलाही बेदरकार होऊन, विनासंकोच निर्भयपणे नाचत होत्या...रात्रीच्या वेळी...तेही रस्त्यावर......आपल्याला आईबाप पोरंबाळे  आहेत हे विसरून ! याची दुसरी बाजू, इतक्या साऱ्या आबालवृद्धांना नाचण्याची इतकी आवड आहे हे या निमित्ताने प्रथमच ध्यानात आलं....अन्यथा ही खुमखुमी अतृप्तच राहिली नसती का?

नृत्यकला निश्चितच श्रेष्ठ आणि आदरणीय आहे परंतु सदर नाचण्याचा त्या अभिजात भारतीय नृत्यकालेशी दुरान्वयानेही संबंध नाहीय, हे उल्लेखनीय ! आदिम समाजात लोक मोठ्यांने ओरडतात...मग गळ्यात गळा घालून रडतात नाचतात वगैरे  यातून कुठेतरी त्यांच्यातील अव्यक्त तणावाचा निचरा होत असतो म्हणे. अंतर्गत तणावाचे ते out-rage असते. हे रस्त्यावर मटकणे  म्हणजे आणिक कशाचं  आउट-रेज असावं?  असंवाद एकलकोंडेपण  की आणखी  काही?

नाद्ब्राम्हाचे  प्रदूषण थांबवा 

ईश्वराजवळ पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे  संगीत..प्रार्थना..नामजप, ओंकार या सगळ्यात एक ध्वनी अनुस्यूत आहे..म्हणून गाण्याला नादब्रम्ह म्हंटलय ...त्या नाद्ब्राम्हाची ही अंधारवाट बघूनसुबुद्ध माणसाला  उद्विग्न व्हायला होतं या .नाद्ब्राम्हाची ऐशीतैशी का?
शांती सबको प्रिय है...जो अशांती फैलाते है...वो भी आपली घरकी शांती खोने नाही देते....म्हणून प्रेमात माणूस हळू आवाजात बोलतो कारण मनाने तो जवळ आलेला असतो. पण राग आला तर भांडताना मात्र जोरात मोठ्याने बोलतो...कारण तो मनाने दूर गेलेला असतो...तेव्हा दोघांमधील अंतर वाढलेले असते. तात्पर्य हळू आवाज हे प्रेमाचे प्रतिक असून मोठा आवाज क्रोधाचे चिन्ह मानावे.

रामकृष्ण मठात मी गेलो असता तेथे असीम शांती होती. सगळे अत्यंत हळू आवाजात बोलत होते. कमी आवाजाने त्यांचे कोणतेच काम थांबत नव्हते. ज्याचेशी बोलायचे त्याला ऐकू गेले तरी पुरे...तेथील स्वामीजी सांगत होते. "संवाद तो जरुरी है...इसलिये चाहे जितना बोलो...उसपे पाबंदी नाही...मगर धीरे बोलो."


हल्ली दिखावा जोरावर असतो...

डमी बुके डमी चेक....मोठा बुके...मोठा केक...मोठे द्वार ...मोठी रोषणाई.. मोठा आवाज ...ग्रुप-डान्स च्या दृश्यात नुसते वाद्यांचे आवाज...रोशनी आय मीन प्रकाश किरणांचे फवारे...आनंद देणाऱ्या संगीताचा येथे दुरान्वयानेही संबंध नाही. असं खेदाने नमूद केल्याबिगर राहवत नाही. गायक गायिका उभे राहून गाणी गात...मागे मर्यादित संगीतसाज असे. पण आता विशाल वाद्यांचे आवाज...आणि भरीसभर हरेक वाद्याच्या तोंडाशी एकेक माईक ठेवलेला...त्याचा कानफाड ढणाणा ऐकून मोफत डोकेदुखी ..अति झालं अन हसू आलं.....

नवी पिढी कधीकधी म्हणते...नेहमी संस्कृती सभ्यता काय सांगता...आम्हाला यात मजा येते..त्याचं काय ? पण हा संकुचित विचार आहे...क्षणकाल अजेचा विचार केला तरी ध्वनी प्रदुषणाच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार कोण करील?

कला ही शांततेतच बहरते 

जगात हरेकाला व्यक्ती-स्वातंत्र्य आहे...त्यात शांततेनं जगण्याचा हक्क समाविष्ट आहे. जेव्हा युद्ध आणि अशांती असते तेव्हा सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम होऊ शकत नाहीत. जेथे शांती आहे तेथेच कला बहरते आणि कलाकार फुलतो !


फटाके हवेत- ध्वनी-प्रदूषण नकोय

दिवाळी म्हणजे आनंददायी पर्वणी. फटके म्हणजे दिवाळीत आतिषबाजी...अनार, रॉकेट भुईचक्र फुलझडी इ. फटाके हे लहान बालकांसाठी ते दिवाळीचे प्रमुख आकर्षण...प्रदुषणाची सबब पुढे करून त्याच्यावर गदा येवू नये.

याचा अर्थ फटाक्यांचे आवाज मुळीच होऊ नये असा अन्वयार्थ कृपया काढू नये. लवंगी फटाक्यांची नाजूक तडतड सुखद असते...कारण ती कानठळ्या बसवत नाही. परंतु मोठे सुतळी बॉम्ब म्हणजे जणु खऱ्या जीवघेण्या बॉम्बची छोटी प्रतिकृतीच ! आणि अशा बॉम्बच्या स्फोटांचे भीषण आवज केवळ युद्धातच असू शकतात. फटक्यांनी ध्वनिसोबत वायुप्रदूषण अशी दुहेरी हानी संभवते...आणि वायू प्रदुषणापेक्षा ध्वनी प्रदूषण जास्त हानिकारक.... तेवढे एक टाळता येईल तर बघा मित्रांनो !अशाने सणवार झाले त्रासदायक ! असा सूर निघू नये हा मतितार्थ ...पारंपारिक सणवार हे आनंदासाठी आणि परस्पर स्नेह-वृधीसाठीच आहेत ना

ध्वनी आणि स्वास्थ्य

डीजे या ध्वनी प्रदुषणाच्या यंत्राने तर कहर केलाय ! . लग्न असो वा बर्थ-डे तो हक्काने वाजवण्यात येतो. यामुळे रक्तदाब वाढतो, कर्णदोष आणि मानसिक विकार निर्माण होऊ शकतात. विज्ञान सांगते अमुक डेसिबल पर्यंतच आवाज मानवी कानांना सुखावह असतो. कानातून थेट मेंदूशी संबंध आहे. मेंदू पासून र्हुदय, रक्ताभिसरण रक्तदाब आणि मानसिक परिणाम यांचं नातं आहे. कानावर आदळणारे ७० टक्के ध्वनी-प्रदूषण हे मानवनिर्मित असून त्यात 30 टक्के कपात सहज होऊ शकते. डीजेच्या अगदी जवळ बसून तरुण पोरं का कानांवर अत्याचार करत असावेत ?

हास्य, मृदू-सुसंवाद, संगीत हे सकारात्मक ध्वनी आहेत. भांडणे शिवीगाळ कर्णकटू आव्वाज हे नकारात्मक ध्वनी आहेत. पूर्वी नैसर्गिक ध्वनी मर्यादित होते. पानाची सळसळ, प्राणीपक्षी यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर,विविध कीटकांचे ऋतुस्वर याशिवाय पडण्याचे आदळण्याचे , रडणे-ओरडणे बोलण्याचे मानवीय आवाज, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट खोकला, शिंक, ढेकर हे शरीर-ध्वनी इ. काही नैसर्गिक आवाज आहेत जे अजिबात त्रासदायक नसतात.यानंतरच्या काळात शंख-ध्वनी, विविध वाद्यांचे आवाज, घाव घालून तोडण्याचे आवाज जमा झालेत. पण आता तर डीजे,लाउड-स्पीकर,गाड्यांचे कर्ण -कर्कश हॉर्न्स, मोबाईलचे रिंग-टोन्स फटाके, सुरुंग-स्फोट इ. अनैसर्गिक मानवनिर्मित असून त्यांची रोकथाम करु या !

हवेचे प्रदूषण पाण्याचे प्रदूषण, अन्नाचे प्रदूषण,याखेरीज नव्याने सांस्कृतिक प्रदूषण, वैचारिक प्रदूषण, भावनिक प्रदूषण हे व्यापक असून त्यावर नियंत्रण अवघड आहे. तुलनेने ध्वनी प्रदूषण रोखणे सोपे आहे. शाळा, कॉलेजेस, इस्पितळे, वृद्धाश्रम येथे कमी डेसिबल आवाजाने शांतता प्रस्थापित व्हावी ..येथेच काय कुठेच आवाजाच त्रास होऊ नये यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असायला हवी. म्हणून प्रगत देशान वाहनांच्या हॉर्न्सच्या डेसिबल्स वर मर्यादा आहेत.

No sound in this worldcan more louderthan silence. If you can not understand anybodys silence...you can not understand his words !

दर्जाशी फारकत आम्हाला काय मिळवून देणार ? आम्ही कोणत्या समाजात राहतो ?

१ time killer वेळखाऊ सेरीअल्स, एकही वाहिनीवर धड कार्यक्रम नसणे.

२ गुणी जनांची थंड उपेक्षा आणि पैसेवाल्यांची चलती. पैसे देवून गायकांकडून गाणी तयार करणे

३ भेसळी अन्न आणि तत्व-विहीन राजनीती

४ खरा दर्जा जाणीवपूर्वक दूर राखणे ..निकृष्ट अल्पजीवी वस्तूंची विक्री वाढावी म्हणून निर्मिती करणे

५ नातिगोति, मैत्र, सौहार्द्र जपण्याची कुणालाच गरज नसणे...भाव नाही देनेका हा एकाच फंडा

६ पुस्तके निघत आहेत...पण सृजनशोध संपलाय...मौलिक संग्राह्य असे खीच न मिळणे.

7 पैशासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असलेले लोक सर्वत्र बघून येनकेन मार्गे पैसा कमावणे हेच एकमेव ध्येय डोळ्यापुढे असणे

8 फिरते विक्रेते, दुरुस्तीवाले किरकोळ व्यावसायिक पोटासाठी अख्खा दिवस खर्ची घालणाऱ्या . श्रामिकांचा समाजाला अव्यक्त हातभार असतो तरी ते आर्थिक विषमतेचे बळी ठरतात. श्रमाशिवाय काहीच साध्य होत नाही तरी श्रमाला मोल नाही ..ही स्थिती किती वाईट 1

९ भावनेचे मोल किती अल्प असते...ते केवळ विशिष्ट ठिकाणी असते..नव्या पिढीसाठी आज आमच्याजवळ काय संचित आहे. पैसा सुखसोयी यांना संचित म्हणता येणार नाही.

१० ज्याला व्यक्त व्हायचय त्याला संधी नाही.पीडितांना .न्याय नव्हे तर केवळ निकाल मिळतोय ...सारे कसल्या तरी समुहाचे वाटेकरी नाहीतर एखाद्या पंथाचे बोट धरून निघालेले वाटसरू

यात दर्जेदार नादमाधुर्य निर्माण करणारा एखादा बुद्धीवादी वर्ग पुढे सरसावेल काय ?


बुद्धी दे गणनायका

गणपती ही विद्या कला क्रीडा यांची देवता आहे. त्यांचे उपासक ध्वनी-प्रदूषण कसे करू सतात. करत असतील तर गणनायका त्यांना सद्बुद्धी डे रे अशी कळकळीची विनंती ! शांती, तृप्ती आणि प्रीती ही सुदृढ समाजाची मुहूर्तमेढ रोवतात...यात सर्वप्रथम मान शांतीचा आहे...ओम शांती शांती शांती हा वेड-मंत्र आम्हाला सडा वंद्य आहे...तरी शान्तिप्रेमिंना शांतीच्या शोधत का भटकावे लागतेय ?

डोंगरीच्या पर्वतावर तुकोबा शांतीच्या शोधतच जात...तेथेच त्यांना अनेक अभंग स्फुरले....म्हणून तुकोबा म्हणतात :-

शांतीपरत नाही सुख

येरं अवघेचि दुःख ||





सांस्कृतिक गुलामगिरीच्या विळख्यात

  सांस्कृतिक गुलामगिरीच्या विळख्यात  मराठी बोलताना मध्ये मध्ये इंग्रजी वर्डस यूज करण्याची जी हॅबीट आहे...विशेषतः न्यू जनरेशन मध्ये ती फारच ड...