गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

दशतत्वांचे प्रदूषण का ?

 


नाद-ब्रम्हाचे प्रदूषण 

लग्नाची वरात, मिरवणूक, शोभायात्रा असो वा गणपती, दुर्गा, शारदा स्थापना किंवा विसर्जन ! हल्ली डीजे नामक कर्कश वाजंत्रीने एकीकडे तरुणाईला वेड लावलंय आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची झोप उडवलीय ! तिसरीकडे प्रदुषणाने पर्यावरणवादींच्या चिंतेत भर घातलीय.  डीजेच्या या भीषण गदारोळात  अभिजात भारतीय संगीत, सदाबहार उपशास्त्रीय संगीत, सनईचे मंजुळ मंगल स्वर कुठेतरी हरवल्यागत झालेयत ! त्यातही संगीतात रिमिक्स, फ्युजन इत्यादी नवनवीन प्रकार बोकाळलेत...अशाने नव्या पिढीला दर्जेदार नाद-माधुर्याची ओळख  ?कशी होणार ? एक जाणकार वर्ग याची   दखल घेत पुढे सरसावेल  काय?


दर्जाहीन सिनेगीतांचे सामाजिक दुष्परिणाम 

तरुणाईच्या तोंडी कोणती गाणी आहेत यावरून देशाच्या नैतिकतेचं मोजमाप करता येतं. १९६० --७० च्या दशकातील सिनेगीतांचा तो इतिहासजमा काळ आठवा ...ती जुनी गाणी सदाबहार या श्रेणीत का मोडतात? मराठी  नाटकांचा सुवर्णकाळ होता ती गाणी रसिक अजूनही तल्लीन होऊन का ऐकतात?   याउलट  हल्ली गाणी कधी येतात आणि विस्मृतीत गडप होतात कळत देखील नाही. असं का ?चोळी के पीछे क्या है ...मुन्नी काय... जलेबीबाई  काय...शीला की जवानी काय...सरकालो खटोली...मी तो तंदुरी मुर्गी...गटकाले  सैया अल्कोहोलसे ...आम्ही कुठे जातोय ? याचा कुठेतरी विचार व्हायला हवा.

पूर्वी ही शब्द-शुचिता कटाक्षाने पाळली जात असे. व्ही.शांताराम यांच्या पिंजरा या गाजलेल्या चित्रपटात जगदीश खेबुडकर यांचे एक गीत आहे...डे रे कान्हा चोळी अन लुगडी...या मूळ गीतात  देहाहूनही नग्न भावना आसे शब्द होते..पण गायिका लताजीनी यावर आक्षेप घेतला...तेव्हा देहाहूनही मुक्त भावना असा बदल करण्यात आला. शब्द शुचितेचे असे भान राखले तर समाजात अनैतिकता पसरणार नाही 

तुरळक सन्मान्य अपवाद वगळता, गाणी एकसुरी तयार होत आहेत. एकाच श्वासात भरभर म्हंटलेले गाणे म्हणून भलावण होते पण त्यात एक  गाणं म्हणून गुणवत्ता किती?   त्याचे संगीत कर्कश तर होत नाही? याचा विचार नवी पिढी करताना दिसत नाही.उलट  नवी पिढी त्यालाच नाविन्याचे प्रतिक मानते...याचा फायदा चालते-पुर्जे व्यावसायिक घेतात आणि  संगीत विटंबन प्रयोग बघावा लागतो किमान ,गाण्याच्य बाबतीत मागची पिढी नक्कीच सुदैवी..  हे खरे की खोटे? 

नुकताच चंद्रपुरातील दुर्गा विसर्जनाच्या दिवशी गाफिलपणे मी  मुख्य मार्गावरून जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला आणि  एक विलक्षण थरार अनुभवला …. दुतर्फा चिंचोळ्या, खडकाळ गल्ल्यामधून क्रमाने दुर्गामुर्ती डी. जे. समवेत येउन मुख्य प्रवाहात सामील होत होत्या। माझ्यासारखे अडकलेले अनेक लोक  विषण्ण  होत्साते  हताशपणे कसाबसा मार्ग काढीत होते. गांधी चौक ते जटपुरा  पूर्ण रस्ता शेकडो डी ज़े. ने व्यापला होता …त्या अनुभवातून हा एक प्रातिनिधिक लेखनप्रपंच !  मनात साहजिकच अनेक प्रश्न निर्माण झाले …!!

शांतीच्या शोधात.....

 कर्कश, कर्णकटू, बिबत्स , गलिच्छ  डी .जे.(Disco Jocky) च्या ध्वनी प्रदूषणाचा धार्मिक भावनेशी दुरान्वयाने  तरी संबंध आहे काय ? धार्मिक भावना सोडा ,,निव्वळ आनंदासाठी असले हिडीस, विकृत, असुरी कृत्य  केले जावू  शकते काय ? रस्त्यावरून वाट काढणाऱ्या निष्पाप नागरिकांचा त्रागा अजिबात ओळखू न शकणारी ही तरुणाई  स्वतःची काय प्रतिमा निर्माण करीत आहे ?

 डी ज़े. च्या घाणेरड्या आवाजावर केवळ आसुरी उन्माद असणाऱ्याना... तेही दारू पिऊनच नाचणे  शक्य आहे . हे वास्तव असताना महिलांचा सहभाग असलेल्या देवीच्या उत्सवात  हे सारे कसे   काय चालते ? मां आ  रही है हर गलीसे ...डीजे के सामने  नाचोंकी फौज लेके ...ये  कैसी विटंबना !!

इथे एकमत कसे ?

खड्डे , अरुंद जागा त्यातून उत्सवाच्या नावे उसळलेला हा उन्माद , अतोनात परिश्रम , वारेमाप पैसा उधळून हा जल्लोष  अखेर काय मिळवून देतो ? याऐवजी काही वेगळे लोकोपयोगी करण्याचे कधीच कुणाच्या मनात का येत नाही, मोठा आवाज निर्माण करण्यात सर्वांचे नेहमी कसे एकमत होते ? कर्कश आवाज निर्मिती  कोणत्या आनंदाचा लाभ करून देते …हे बराच विचार करूनही आकलन झाले नाही !

हा तो नटराजाचा अपमान 

या निमित्ताने लक्षात आले …अरेच्चा इतक्या लोकांना हात वर करून कंबर हलवायची आवड होती तर !! ( होय… याला नाच कसे म्हणावे …तो नृत्य कलेचा अपमान होईल ) या शारीरिक कृतीतून ते काय व्यक्त करू इच्छितात ? या हीन अभिरुचीच्या प्रदर्शनाने कोणत्या ताणाचा निचरा होणार ?
हे पराभूत मानसिकतेचे लक्षण नाही काय? दर्जेदार भारतीय संगीताच्या देशात हि हीन अभिरुचीची राक्षसी महत्वाकांक्षा कोठून आली ?

मंडळात  एकी नाही …।  अन्यथा समोरासमोर मूर्ती बसवल्या नसत्या …तसेच एखाद्या  लोकोपयोगी कार्यासाठी हे सर्व जण   मिळून काही करताना कधी का दिसत नाही ?

यावर चर्चा केली असता जाणकार म्हातारबुवा एकाच उपाय सांगत होते  …या  दिवशी  चुकूनही या मार्गावर सुजाण माणसाने येऊ नये…परंतु हा उपाय नसून एक नकारात्मक दहशत आहे हे ध्यानात कसे येत नाही ?या सामाजिक  समस्येवर सकारात्मक क्रांतिकारक बदल घडवून आणणारा कुणी माई का लाल कधीच पैदा होणार नाही का ?प्रश्न …प्रश्न …आणि प्रश्न  !!!
 
डिजे एक भीषण मानवनिर्मित  अमानवीय संकट

विज्ञानाने माईक आणि आवाज कमीजास्त करण्याची सुविधा दिली आणि धूर्त मानवाला गैरवापर करण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी ग्रामीण भागात भाषण करीत.तेथे माईक नसत...तेव्हा गांधीजी मध्ये उभे राहत भोवताली चारही बाजूनी श्रोते.... असे ते दृश्य असे.

जागोजाग गणपती, देवी, शारदा ...अचानक एवढी धार्मिकता कशी वाढली? विसर्जनाच्या दिवशी मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तरुणांच्या गणेश मंडळाची बात सोडा.. अगदी गल्लीतल्या  महिला मंडळाच्या देवीला आगमन आणि गमानाला संदल बोलावला होता. संदल पथकाजवळ नवेकोरे संदल दिसले. जागोजाग मागणी वाढली असावी...मागणी तसा पुरवठा हा तर अर्थशास्त्राचा सिद्धांतच आहे.पूर्वी केवळ मोठे आयोजकच हे सारे करू शकत असत...त्याआधी संदल हे मोहर्रमच्या उरूसलाच दिसायचे.पण आता हम किसीसे कम नही हा नारा जिंदाबाद  आहे. 

गणपती नंतर महिनाभराने देवी येतात...देवी या गणपतीच्या तुलनेत दुप्पट असतात. याचे कारण बहुदा गणपतीत पुरुष आणि युवावर्गाचा भरणा असतो पण देवी उत्सवात मात्र उर्वरित ५० टक्के महिला  सामील होतात. परिणामी गणपतीच्या तुलनेने दुर्गा अधिक दिसणे क्रमप्राप्तच ! या धार्मिक निमित्ताने नाद्ब्राम्हाची ऐशी-तैशी का? हा विषय चर्चेचा नाही का? डीजे चे एकावर एक व्हुपर ठेवून ते वाजत असताना त्याला टेकून एखादा पोऱ्या आरामात कसा बसू शकतो? मन-मस्तिष्क वर इतक्या आवाजाला कसे सहन केले जावू शकते? रस्त्यात कुणाचं चुकून धक्का लागला तर्लागेच गाली-गलौच आणि व्यक्ती-स्वातंत्र्यावर आक्रमण होते...मग हे सारे दुष्परिणामा कडे डोळेझाक का?

त्रासले बाप्पा डीजे पायी 

सार्वजनिक गणपतीच्या उत्सवाचा मूळ उद्देश जर संपला असेल आणि त्यात हे हिडीस प्रकार खुद्द बाप्पाही हे सर्व बघून त्रासले आहेत अशी व्यंगचित्रे आपण या दिवसात बघायला मिळतात.

अहाहा काय पण उत्तेजक दृश्य....डिस्को जॉकीच्या तालावर सॉरी ठेक्यावर  संदल बडवत होते. पोरं पोरी इतकाच काय साड्या नेसलेल्या वयस्कर महिलाही बेदरकार होऊन, विनासंकोच निर्भयपणे नाचत होत्या...रात्रीच्या वेळी...तेही रस्त्यावर......आपल्याला आईबाप पोरंबाळे  आहेत हे विसरून ! याची दुसरी बाजू, इतक्या साऱ्या आबालवृद्धांना नाचण्याची इतकी आवड आहे हे या निमित्ताने प्रथमच ध्यानात आलं....अन्यथा ही खुमखुमी अतृप्तच राहिली नसती का?

नृत्यकला निश्चितच श्रेष्ठ आणि आदरणीय आहे परंतु सदर नाचण्याचा त्या अभिजात भारतीय नृत्यकालेशी दुरान्वयानेही संबंध नाहीय, हे उल्लेखनीय ! आदिम समाजात लोक मोठ्यांने ओरडतात...मग गळ्यात गळा घालून रडतात नाचतात वगैरे  यातून कुठेतरी त्यांच्यातील अव्यक्त तणावाचा निचरा होत असतो म्हणे. अंतर्गत तणावाचे ते out-rage असते. हे रस्त्यावर मटकणे  म्हणजे आणिक कशाचं  आउट-रेज असावं?  असंवाद एकलकोंडेपण  की आणखी  काही?

नाद्ब्राम्हाचे  प्रदूषण थांबवा 

ईश्वराजवळ पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे  संगीत..प्रार्थना..नामजप, ओंकार या सगळ्यात एक ध्वनी अनुस्यूत आहे..म्हणून गाण्याला नादब्रम्ह म्हंटलय ...त्या नाद्ब्राम्हाची ही अंधारवाट बघूनसुबुद्ध माणसाला  उद्विग्न व्हायला होतं या .नाद्ब्राम्हाची ऐशीतैशी का?
शांती सबको प्रिय है...जो अशांती फैलाते है...वो भी आपली घरकी शांती खोने नाही देते....म्हणून प्रेमात माणूस हळू आवाजात बोलतो कारण मनाने तो जवळ आलेला असतो. पण राग आला तर भांडताना मात्र जोरात मोठ्याने बोलतो...कारण तो मनाने दूर गेलेला असतो...तेव्हा दोघांमधील अंतर वाढलेले असते. तात्पर्य हळू आवाज हे प्रेमाचे प्रतिक असून मोठा आवाज क्रोधाचे चिन्ह मानावे.

रामकृष्ण मठात मी गेलो असता तेथे असीम शांती होती. सगळे अत्यंत हळू आवाजात बोलत होते. कमी आवाजाने त्यांचे कोणतेच काम थांबत नव्हते. ज्याचेशी बोलायचे त्याला ऐकू गेले तरी पुरे...तेथील स्वामीजी सांगत होते. "संवाद तो जरुरी है...इसलिये चाहे जितना बोलो...उसपे पाबंदी नाही...मगर धीरे बोलो."


हल्ली दिखावा जोरावर असतो...

डमी बुके डमी चेक....मोठा बुके...मोठा केक...मोठे द्वार ...मोठी रोषणाई.. मोठा आवाज ...ग्रुप-डान्स च्या दृश्यात नुसते वाद्यांचे आवाज...रोशनी आय मीन प्रकाश किरणांचे फवारे...आनंद देणाऱ्या संगीताचा येथे दुरान्वयानेही संबंध नाही. असं खेदाने नमूद केल्याबिगर राहवत नाही. गायक गायिका उभे राहून गाणी गात...मागे मर्यादित संगीतसाज असे. पण आता विशाल वाद्यांचे आवाज...आणि भरीसभर हरेक वाद्याच्या तोंडाशी एकेक माईक ठेवलेला...त्याचा कानफाड ढणाणा ऐकून मोफत डोकेदुखी ..अति झालं अन हसू आलं.....

नवी पिढी कधीकधी म्हणते...नेहमी संस्कृती सभ्यता काय सांगता...आम्हाला यात मजा येते..त्याचं काय ? पण हा संकुचित विचार आहे...क्षणकाल अजेचा विचार केला तरी ध्वनी प्रदुषणाच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार कोण करील?

कला ही शांततेतच बहरते 

जगात हरेकाला व्यक्ती-स्वातंत्र्य आहे...त्यात शांततेनं जगण्याचा हक्क समाविष्ट आहे. जेव्हा युद्ध आणि अशांती असते तेव्हा सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम होऊ शकत नाहीत. जेथे शांती आहे तेथेच कला बहरते आणि कलाकार फुलतो !


फटाके हवेत- ध्वनी-प्रदूषण नकोय

दिवाळी म्हणजे आनंददायी पर्वणी. फटके म्हणजे दिवाळीत आतिषबाजी...अनार, रॉकेट भुईचक्र फुलझडी इ. फटाके हे लहान बालकांसाठी ते दिवाळीचे प्रमुख आकर्षण...प्रदुषणाची सबब पुढे करून त्याच्यावर गदा येवू नये.

याचा अर्थ फटाक्यांचे आवाज मुळीच होऊ नये असा अन्वयार्थ कृपया काढू नये. लवंगी फटाक्यांची नाजूक तडतड सुखद असते...कारण ती कानठळ्या बसवत नाही. परंतु मोठे सुतळी बॉम्ब म्हणजे जणु खऱ्या जीवघेण्या बॉम्बची छोटी प्रतिकृतीच ! आणि अशा बॉम्बच्या स्फोटांचे भीषण आवज केवळ युद्धातच असू शकतात. फटक्यांनी ध्वनिसोबत वायुप्रदूषण अशी दुहेरी हानी संभवते...आणि वायू प्रदुषणापेक्षा ध्वनी प्रदूषण जास्त हानिकारक.... तेवढे एक टाळता येईल तर बघा मित्रांनो !अशाने सणवार झाले त्रासदायक ! असा सूर निघू नये हा मतितार्थ ...पारंपारिक सणवार हे आनंदासाठी आणि परस्पर स्नेह-वृधीसाठीच आहेत ना

ध्वनी आणि स्वास्थ्य

डीजे या ध्वनी प्रदुषणाच्या यंत्राने तर कहर केलाय ! . लग्न असो वा बर्थ-डे तो हक्काने वाजवण्यात येतो. यामुळे रक्तदाब वाढतो, कर्णदोष आणि मानसिक विकार निर्माण होऊ शकतात. विज्ञान सांगते अमुक डेसिबल पर्यंतच आवाज मानवी कानांना सुखावह असतो. कानातून थेट मेंदूशी संबंध आहे. मेंदू पासून र्हुदय, रक्ताभिसरण रक्तदाब आणि मानसिक परिणाम यांचं नातं आहे. कानावर आदळणारे ७० टक्के ध्वनी-प्रदूषण हे मानवनिर्मित असून त्यात 30 टक्के कपात सहज होऊ शकते. डीजेच्या अगदी जवळ बसून तरुण पोरं का कानांवर अत्याचार करत असावेत ?

हास्य, मृदू-सुसंवाद, संगीत हे सकारात्मक ध्वनी आहेत. भांडणे शिवीगाळ कर्णकटू आव्वाज हे नकारात्मक ध्वनी आहेत. पूर्वी नैसर्गिक ध्वनी मर्यादित होते. पानाची सळसळ, प्राणीपक्षी यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर,विविध कीटकांचे ऋतुस्वर याशिवाय पडण्याचे आदळण्याचे , रडणे-ओरडणे बोलण्याचे मानवीय आवाज, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट खोकला, शिंक, ढेकर हे शरीर-ध्वनी इ. काही नैसर्गिक आवाज आहेत जे अजिबात त्रासदायक नसतात.यानंतरच्या काळात शंख-ध्वनी, विविध वाद्यांचे आवाज, घाव घालून तोडण्याचे आवाज जमा झालेत. पण आता तर डीजे,लाउड-स्पीकर,गाड्यांचे कर्ण -कर्कश हॉर्न्स, मोबाईलचे रिंग-टोन्स फटाके, सुरुंग-स्फोट इ. अनैसर्गिक मानवनिर्मित असून त्यांची रोकथाम करु या !

हवेचे प्रदूषण पाण्याचे प्रदूषण, अन्नाचे प्रदूषण,याखेरीज नव्याने सांस्कृतिक प्रदूषण, वैचारिक प्रदूषण, भावनिक प्रदूषण हे व्यापक असून त्यावर नियंत्रण अवघड आहे. तुलनेने ध्वनी प्रदूषण रोखणे सोपे आहे. शाळा, कॉलेजेस, इस्पितळे, वृद्धाश्रम येथे कमी डेसिबल आवाजाने शांतता प्रस्थापित व्हावी ..येथेच काय कुठेच आवाजाच त्रास होऊ नये यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असायला हवी. म्हणून प्रगत देशान वाहनांच्या हॉर्न्सच्या डेसिबल्स वर मर्यादा आहेत.

No sound in this worldcan more louderthan silence. If you can not understand anybodys silence...you can not understand his words !

दर्जाशी फारकत आम्हाला काय मिळवून देणार ? आम्ही कोणत्या समाजात राहतो ?

१ time killer वेळखाऊ सेरीअल्स, एकही वाहिनीवर धड कार्यक्रम नसणे.

२ गुणी जनांची थंड उपेक्षा आणि पैसेवाल्यांची चलती. पैसे देवून गायकांकडून गाणी तयार करणे

३ भेसळी अन्न आणि तत्व-विहीन राजनीती

४ खरा दर्जा जाणीवपूर्वक दूर राखणे ..निकृष्ट अल्पजीवी वस्तूंची विक्री वाढावी म्हणून निर्मिती करणे

५ नातिगोति, मैत्र, सौहार्द्र जपण्याची कुणालाच गरज नसणे...भाव नाही देनेका हा एकाच फंडा

६ पुस्तके निघत आहेत...पण सृजनशोध संपलाय...मौलिक संग्राह्य असे खीच न मिळणे.

7 पैशासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असलेले लोक सर्वत्र बघून येनकेन मार्गे पैसा कमावणे हेच एकमेव ध्येय डोळ्यापुढे असणे

8 फिरते विक्रेते, दुरुस्तीवाले किरकोळ व्यावसायिक पोटासाठी अख्खा दिवस खर्ची घालणाऱ्या . श्रामिकांचा समाजाला अव्यक्त हातभार असतो तरी ते आर्थिक विषमतेचे बळी ठरतात. श्रमाशिवाय काहीच साध्य होत नाही तरी श्रमाला मोल नाही ..ही स्थिती किती वाईट 1

९ भावनेचे मोल किती अल्प असते...ते केवळ विशिष्ट ठिकाणी असते..नव्या पिढीसाठी आज आमच्याजवळ काय संचित आहे. पैसा सुखसोयी यांना संचित म्हणता येणार नाही.

१० ज्याला व्यक्त व्हायचय त्याला संधी नाही.पीडितांना .न्याय नव्हे तर केवळ निकाल मिळतोय ...सारे कसल्या तरी समुहाचे वाटेकरी नाहीतर एखाद्या पंथाचे बोट धरून निघालेले वाटसरू

यात दर्जेदार नादमाधुर्य निर्माण करणारा एखादा बुद्धीवादी वर्ग पुढे सरसावेल काय ?


बुद्धी दे गणनायका

गणपती ही विद्या कला क्रीडा यांची देवता आहे. त्यांचे उपासक ध्वनी-प्रदूषण कसे करू सतात. करत असतील तर गणनायका त्यांना सद्बुद्धी डे रे अशी कळकळीची विनंती ! शांती, तृप्ती आणि प्रीती ही सुदृढ समाजाची मुहूर्तमेढ रोवतात...यात सर्वप्रथम मान शांतीचा आहे...ओम शांती शांती शांती हा वेड-मंत्र आम्हाला सडा वंद्य आहे...तरी शान्तिप्रेमिंना शांतीच्या शोधत का भटकावे लागतेय ?

डोंगरीच्या पर्वतावर तुकोबा शांतीच्या शोधतच जात...तेथेच त्यांना अनेक अभंग स्फुरले....म्हणून तुकोबा म्हणतात :-

शांतीपरत नाही सुख

येरं अवघेचि दुःख ||





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सांस्कृतिक गुलामगिरीच्या विळख्यात

  सांस्कृतिक गुलामगिरीच्या विळख्यात  मराठी बोलताना मध्ये मध्ये इंग्रजी वर्डस यूज करण्याची जी हॅबीट आहे...विशेषतः न्यू जनरेशन मध्ये ती फारच ड...