नाद-ब्रम्हाचे प्रदूषण
लग्नाची वरात, मिरवणूक, शोभायात्रा असो वा गणपती, दुर्गा, शारदा स्थापना किंवा विसर्जन ! हल्ली डीजे नामक कर्कश वाजंत्रीने एकीकडे तरुणाईला वेड लावलंय आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची झोप उडवलीय ! तिसरीकडे प्रदुषणाने पर्यावरणवादींच्या चिंतेत भर घातलीय. डीजेच्या या भीषण गदारोळात अभिजात भारतीय संगीत, सदाबहार उपशास्त्रीय संगीत, सनईचे मंजुळ मंगल स्वर कुठेतरी हरवल्यागत झालेयत ! त्यातही संगीतात रिमिक्स, फ्युजन इत्यादी नवनवीन प्रकार बोकाळलेत...अशाने नव्या पिढीला दर्जेदार नाद-माधुर्याची ओळख ?कशी होणार ? एक जाणकार वर्ग याची दखल घेत पुढे सरसावेल काय?
दर्जाहीन सिनेगीतांचे सामाजिक दुष्परिणाम
कर्कश, कर्णकटू, बिबत्स , गलिच्छ डी .जे.(Disco Jocky) च्या ध्वनी प्रदूषणाचा धार्मिक भावनेशी दुरान्वयाने तरी संबंध आहे काय ? धार्मिक भावना सोडा ,,निव्वळ आनंदासाठी असले हिडीस, विकृत, असुरी कृत्य केले जावू शकते काय ? रस्त्यावरून वाट काढणाऱ्या निष्पाप नागरिकांचा त्रागा अजिबात ओळखू न शकणारी ही तरुणाई स्वतःची काय प्रतिमा निर्माण करीत आहे ?
डी ज़े. च्या घाणेरड्या आवाजावर केवळ आसुरी उन्माद असणाऱ्याना... तेही दारू पिऊनच नाचणे शक्य आहे . हे वास्तव असताना महिलांचा सहभाग असलेल्या देवीच्या उत्सवात हे सारे कसे काय चालते ? मां आ रही है हर गलीसे ...डीजे के सामने नाचोंकी फौज लेके ...ये कैसी विटंबना !!
इथे एकमत कसे ?
या निमित्ताने लक्षात आले …अरेच्चा इतक्या लोकांना हात वर करून कंबर हलवायची आवड होती तर !! ( होय… याला नाच कसे म्हणावे …तो नृत्य कलेचा अपमान होईल ) या शारीरिक कृतीतून ते काय व्यक्त करू इच्छितात ? या हीन अभिरुचीच्या प्रदर्शनाने कोणत्या ताणाचा निचरा होणार ?
हे पराभूत मानसिकतेचे लक्षण नाही काय? दर्जेदार भारतीय संगीताच्या देशात हि हीन अभिरुचीची राक्षसी महत्वाकांक्षा कोठून आली ?
मंडळात एकी नाही …। अन्यथा समोरासमोर मूर्ती बसवल्या नसत्या …तसेच एखाद्या लोकोपयोगी कार्यासाठी हे सर्व जण मिळून काही करताना कधी का दिसत नाही ?
यावर चर्चा केली असता जाणकार म्हातारबुवा एकाच उपाय सांगत होते …या दिवशी चुकूनही या मार्गावर सुजाण माणसाने येऊ नये…परंतु हा उपाय नसून एक नकारात्मक दहशत आहे हे ध्यानात कसे येत नाही ?या सामाजिक समस्येवर सकारात्मक क्रांतिकारक बदल घडवून आणणारा कुणी माई का लाल कधीच पैदा होणार नाही का ?प्रश्न …प्रश्न …आणि प्रश्न !!!
डिजे एक भीषण मानवनिर्मित अमानवीय संकट
डमी बुके डमी चेक....मोठा बुके...मोठा केक...मोठे द्वार ...मोठी रोषणाई.. मोठा आवाज ...ग्रुप-डान्स च्या दृश्यात नुसते वाद्यांचे आवाज...रोशनी आय मीन प्रकाश किरणांचे फवारे...आनंद देणाऱ्या संगीताचा येथे दुरान्वयानेही संबंध नाही. असं खेदाने नमूद केल्याबिगर राहवत नाही. गायक गायिका उभे राहून गाणी गात...मागे मर्यादित संगीतसाज असे. पण आता विशाल वाद्यांचे आवाज...आणि भरीसभर हरेक वाद्याच्या तोंडाशी एकेक माईक ठेवलेला...त्याचा कानफाड ढणाणा ऐकून मोफत डोकेदुखी ..अति झालं अन हसू आलं.....
नवी पिढी कधीकधी म्हणते...नेहमी संस्कृती सभ्यता काय सांगता...आम्हाला यात मजा येते..त्याचं काय ? पण हा संकुचित विचार आहे...क्षणकाल अजेचा विचार केला तरी ध्वनी प्रदुषणाच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार कोण करील?
कला ही शांततेतच बहरते
जगात हरेकाला व्यक्ती-स्वातंत्र्य आहे...त्यात शांततेनं जगण्याचा हक्क समाविष्ट आहे. जेव्हा युद्ध आणि अशांती असते तेव्हा सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम होऊ शकत नाहीत. जेथे शांती आहे तेथेच कला बहरते आणि कलाकार फुलतो !
फटाके हवेत- ध्वनी-प्रदूषण नकोय
दिवाळी म्हणजे आनंददायी पर्वणी. फटके म्हणजे दिवाळीत आतिषबाजी...अनार, रॉकेट भुईचक्र फुलझडी इ. फटाके हे लहान बालकांसाठी ते दिवाळीचे प्रमुख आकर्षण...प्रदुषणाची सबब पुढे करून त्याच्यावर गदा येवू नये.
याचा अर्थ फटाक्यांचे आवाज मुळीच होऊ नये असा अन्वयार्थ कृपया काढू नये. लवंगी फटाक्यांची नाजूक तडतड सुखद असते...कारण ती कानठळ्या बसवत नाही. परंतु मोठे सुतळी बॉम्ब म्हणजे जणु खऱ्या जीवघेण्या बॉम्बची छोटी प्रतिकृतीच ! आणि अशा बॉम्बच्या स्फोटांचे भीषण आवज केवळ युद्धातच असू शकतात. फटक्यांनी ध्वनिसोबत वायुप्रदूषण अशी दुहेरी हानी संभवते...आणि वायू प्रदुषणापेक्षा ध्वनी प्रदूषण जास्त हानिकारक.... तेवढे एक टाळता येईल तर बघा मित्रांनो !अशाने सणवार झाले त्रासदायक ! असा सूर निघू नये हा मतितार्थ ...पारंपारिक सणवार हे आनंदासाठी आणि परस्पर स्नेह-वृधीसाठीच आहेत ना
ध्वनी आणि स्वास्थ्य
डीजे या ध्वनी प्रदुषणाच्या यंत्राने तर कहर केलाय ! . लग्न असो वा बर्थ-डे तो हक्काने वाजवण्यात येतो. यामुळे रक्तदाब वाढतो, कर्णदोष आणि मानसिक विकार निर्माण होऊ शकतात. विज्ञान सांगते अमुक डेसिबल पर्यंतच आवाज मानवी कानांना सुखावह असतो. कानातून थेट मेंदूशी संबंध आहे. मेंदू पासून र्हुदय, रक्ताभिसरण रक्तदाब आणि मानसिक परिणाम यांचं नातं आहे. कानावर आदळणारे ७० टक्के ध्वनी-प्रदूषण हे मानवनिर्मित असून त्यात 30 टक्के कपात सहज होऊ शकते. डीजेच्या अगदी जवळ बसून तरुण पोरं का कानांवर अत्याचार करत असावेत ?
हास्य, मृदू-सुसंवाद, संगीत हे सकारात्मक ध्वनी आहेत. भांडणे शिवीगाळ कर्णकटू आव्वाज हे नकारात्मक ध्वनी आहेत. पूर्वी नैसर्गिक ध्वनी मर्यादित होते. पानाची सळसळ, प्राणीपक्षी यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर,विविध कीटकांचे ऋतुस्वर याशिवाय पडण्याचे आदळण्याचे , रडणे-ओरडणे बोलण्याचे मानवीय आवाज, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट खोकला, शिंक, ढेकर हे शरीर-ध्वनी इ. काही नैसर्गिक आवाज आहेत जे अजिबात त्रासदायक नसतात.यानंतरच्या काळात शंख-ध्वनी, विविध वाद्यांचे आवाज, घाव घालून तोडण्याचे आवाज जमा झालेत. पण आता तर डीजे,लाउड-स्पीकर,गाड्यांचे कर्ण -कर्कश हॉर्न्स, मोबाईलचे रिंग-टोन्स फटाके, सुरुंग-स्फोट इ. अनैसर्गिक मानवनिर्मित असून त्यांची रोकथाम करु या !
हवेचे प्रदूषण पाण्याचे प्रदूषण, अन्नाचे प्रदूषण,याखेरीज नव्याने सांस्कृतिक प्रदूषण, वैचारिक प्रदूषण, भावनिक प्रदूषण हे व्यापक असून त्यावर नियंत्रण अवघड आहे. तुलनेने ध्वनी प्रदूषण रोखणे सोपे आहे. शाळा, कॉलेजेस, इस्पितळे, वृद्धाश्रम येथे कमी डेसिबल आवाजाने शांतता प्रस्थापित व्हावी ..येथेच काय कुठेच आवाजाच त्रास होऊ नये यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असायला हवी. म्हणून प्रगत देशान वाहनांच्या हॉर्न्सच्या डेसिबल्स वर मर्यादा आहेत.
No sound in this worldcan more louderthan silence. If you can not understand anybodys silence...you can not understand his words !
दर्जाशी फारकत आम्हाला काय मिळवून देणार ? आम्ही कोणत्या समाजात राहतो ?
१ time killer वेळखाऊ सेरीअल्स, एकही वाहिनीवर धड कार्यक्रम नसणे.
२ गुणी जनांची थंड उपेक्षा आणि पैसेवाल्यांची चलती. पैसे देवून गायकांकडून गाणी तयार करणे
३ भेसळी अन्न आणि तत्व-विहीन राजनीती
४ खरा दर्जा जाणीवपूर्वक दूर राखणे ..निकृष्ट अल्पजीवी वस्तूंची विक्री वाढावी म्हणून निर्मिती करणे
५ नातिगोति, मैत्र, सौहार्द्र जपण्याची कुणालाच गरज नसणे...भाव नाही देनेका हा एकाच फंडा
६ पुस्तके निघत आहेत...पण सृजनशोध संपलाय...मौलिक संग्राह्य असे खीच न मिळणे.
7 पैशासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असलेले लोक सर्वत्र बघून येनकेन मार्गे पैसा कमावणे हेच एकमेव ध्येय डोळ्यापुढे असणे
8 फिरते विक्रेते, दुरुस्तीवाले किरकोळ व्यावसायिक पोटासाठी अख्खा दिवस खर्ची घालणाऱ्या . श्रामिकांचा समाजाला अव्यक्त हातभार असतो तरी ते आर्थिक विषमतेचे बळी ठरतात. श्रमाशिवाय काहीच साध्य होत नाही तरी श्रमाला मोल नाही ..ही स्थिती किती वाईट 1
९ भावनेचे मोल किती अल्प असते...ते केवळ विशिष्ट ठिकाणी असते..नव्या पिढीसाठी आज आमच्याजवळ काय संचित आहे. पैसा सुखसोयी यांना संचित म्हणता येणार नाही.
१० ज्याला व्यक्त व्हायचय त्याला संधी नाही.पीडितांना .न्याय नव्हे तर केवळ निकाल मिळतोय ...सारे कसल्या तरी समुहाचे वाटेकरी नाहीतर एखाद्या पंथाचे बोट धरून निघालेले वाटसरू
यात दर्जेदार नादमाधुर्य निर्माण करणारा एखादा बुद्धीवादी वर्ग पुढे सरसावेल काय ?
बुद्धी दे गणनायका
गणपती ही विद्या कला क्रीडा यांची देवता आहे. त्यांचे उपासक ध्वनी-प्रदूषण कसे करू सतात. करत असतील तर गणनायका त्यांना सद्बुद्धी डे रे अशी कळकळीची विनंती ! शांती, तृप्ती आणि प्रीती ही सुदृढ समाजाची मुहूर्तमेढ रोवतात...यात सर्वप्रथम मान शांतीचा आहे...ओम शांती शांती शांती हा वेड-मंत्र आम्हाला सडा वंद्य आहे...तरी शान्तिप्रेमिंना शांतीच्या शोधत का भटकावे लागतेय ?
डोंगरीच्या पर्वतावर तुकोबा शांतीच्या शोधतच जात...तेथेच त्यांना अनेक अभंग स्फुरले....म्हणून तुकोबा म्हणतात :-
शांतीपरत नाही सुख
येरं अवघेचि दुःख ||
